
लोहोणेर येथील जनता विद्यालयात वीर बाल दिवस साजरा करताना मुख्याध्यापिका के.ए.शिंदे, उपमुख्याध्यापक एन.आर.ठाकरे, पर्यवेक्षक व्ही.एम.निकम समवेत उपस्थित विद्यार्थी व शिक्षकवृंद.(छाया-: सुनिल एखंडे
लोहोणेर-: येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात वीर बाल दिवस मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका के.ए.शिंदे होत्या. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक एन. आर. ठाकरे,पर्यवेक्षक व्ही.एम.निकम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी वीर बाल दिवसाचा इतिहास सांगताना साहिबजादे बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या अद्वितीय शौर्य,धर्मनिष्ठा व बलिदानाची माहिती दिली.लहान वयातही अन्यायासमोर न झुकता त्यांनी सत्य आणि धर्मासाठी दिलेले बलिदान आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापिका के. ए.शिंदे यांनी वीर बाल दिवस २६ डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो याविषयी सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांनी या वीर बालकांच्या जीवनातून धैर्य, देशप्रेम, नीतिमत्ता आणि आत्मविश्वासाचे धडे घ्यावेत,असे आवाहन केले.अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना बळकट होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे फलक लेखन कलाशिक्षिका सोनाली धोंडगे यांनी केले.
