
नाशिकरोड:- (प्रतिनिधी )पळसे येथील धनसमृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेच्या १२ ज्योतिर्लिंगांची सचित्र माहिती असणाऱ्या नववर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थेचे चेअरमन शामराव गायधनी, व्हा.चेअरमन शरद ढमाले, जनसंपर्क संचालक मनोज गायधनी, कर्जसमिती अध्यक्ष भारत ढेरिंगे, संचालक किरण ढेरिंगे, इंद्रभान जाधव, नितीन ढेरिंगे, विजय वाणी, अमोल जाधव, राहुल धात्रक, ज्येष्ठ सभासद एकनाथ आगळे, विष्णू गायधनी, भाऊसाहेब गायधनी, शेखर ढेरिंगे, प्रतीक जाधव, राहुल तुंगार, निलेश मोरे, सचिन ढेरिंगे आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे कर्मचारी सुमीत पाटील, पूजा टावरे, काजोल गायधनी आदी उपस्थित होते.
