
नांदगाव (प्रतिनिधी)आपण सर्वजण हिंदुस्तानी आहोत गणेश उत्सव उत्साहाने आणि सामंजस्याने साजरा करणे हीच खरी आपली परंपरा आहे. असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिक्षक बाजीराव महाजन यांनी केले. ते नांदगाव येथे सावता महाराज कंपाऊंड मध्ये तालुक्यातील गणेशोत्सव तयारी संदर्भात विविध गणेश मंडळांच्या पदाधिकारी व पोलीस पाटील, तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी योगेश पाटील, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते. आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या शांतता कमिटी ची बैठक शनिवारी दि. 23 ॴॅगस्टला दुपारी आयोजित केली होती या बैठकीतच्या अध्यक्ष स्थानावरुन त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नांदगावचे पोलिस निरीक्षक दिनकर भदाणे व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मंडळांनी सभा मंडपात भगवा ध्वज व छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा लावाव्यात अशी माफक सुचना दत्तराज छाजेड यांनी मनोगतात व्यक्त केली. तर गणेशोत्सव काळात वीज खंडीत होऊ नये यासाठी काळजी महाराष्ट्र राज्य वीज महावितरणाने घ्यावी असे मत पत्रकार विजय धामणे यांनी व्यक्त केले. तर नगरपालिकेने शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे त्वरित बुजवावेत. तसेच रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य हटविण्याची सुचना संतोष गुप्ता यांनी केली. तसेच मोकाट गोवंशामुळे अनेकदा अडथळा निर्माण होतो व त्यामुळे अपघाताची किंवा जीवीत हाती होण्याचा धोका होतो यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशी मागणी बैठकीत करण्यात आली.अनेक मंडळे मोठ्या गणेश मूर्ती बसवतात त्यामुळे विद्युत मंडळाने तार दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी कपील तेलुरे यांनी केली. गणपती उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा असे आवाहन पोलिस प्रशासनाने जनतेला व गणेश उत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यावेळी सांगण्यात आले. नांदगाव परिसरातील गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे व नागरिक उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
