
विविध पोटजाती मध्ये विभागलेला माळी समाज “माळी ” म्हणून एकत्र यावा, आपापसात विवाह करावेत. तसेच एकमेकांना माळी म्हणून सहकार्य करावे, पुढील काळात माळी समाजाचा मोठा दबावगट निर्माण व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ठाणे येथे 7 जून 2026 रोजी सर्व शाखीय माळी समाज एकीकरण मेळावा उत्साहात संपन्न झाला.
सदरील मेळाव्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. संत सावता महाराजांचे वंशज ह भ प रविकांत महाराज वसेकर यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.तसेच मा. अविनाश भाऊ ठाकरे, मा. किरणजी झोडगे, मा. निलेशजी शेंडकर, मा. डी. के. माळी, मा. संजय वाघोले साहेब, मा. पूनमताई माळी, मा. दिनेश टाकरखेडे, मा. धर्मेंद्र वाघोले, मा. प्रभाकर सातव, मा. कुंडलिक चौधरी, मा. गोविंद डाके, मा. रोहित भुजबळ, मा. सुप्रिया जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमाचे आयोजन व्याख्याते परमेश्वर बनकर, नवनाथ होले, लहू अनारसे, प्रफुल वाघोले यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका काळे यांनी केले होते.
