येथील बोरस्ते विद्यालयात आयोजित पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनविण्याच्या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थीं समवेत मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे आदी


वरील पुस्तक फक्त 100 रु . घरपोच मिळवा, त्यासाठी 9960330438 या नंतर वर फोन पे करा व आपल्या पत्रासह त्याच नंबरवर पैसे टाकल्याचा स्क्रीन शाॅट व तुमचा पत्ता टाका
ओझर:दि.२३ वार्ताहर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात गणेशोत्सवा निमित्त शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थ्यांनी स्वतः पर्यावरणपूरक शाडूमातीच्या श्रीगणेशमूर्ती साकारत प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा पालकांना संदेश दिला. मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या प्रयत्नाने तेरा क्विंटल शाडूमाती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊन कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. कलाशिक्षिका मोनाली निकम मोहन क्षीरसागर वर्षा पाटील यांनी कार्यशाळेचे आयोजन केले. यावेळी मोनाली निकम यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्ती कशी साकारावी याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे मंगल सावंत सरोज खालकर क्रीडा शिक्षिका उज्वला जाधव रेखा देशमाने आत्माराम शिंदे नरेंद्र डेरले आदी उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे म्हणाले की, यामागील खरा उद्देश प्रदूषण टाळून पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षणाची जोड लाभावी याशिवाय गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा उत्सव असून पर्यावरण संवर्धन ही आपली सर्वांची जबाबदारी असून रसायनयुक्त मूर्तीमुळे सार्वजनिक ठिकाणी होणारे प्रदूषण टाळण्यासाठी शाडूमातीच्या मूर्ती हा सर्वात उत्कृष्ट पर्याय असून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी साकारलेल्या या मूर्तीतून त्यांचे कौशल्य उपक्रमशील व पर्यावरणाबद्दलची जाणीव दिसून आली. आणि यामुळे विद्यार्थ्यांना बालपणापासून संस्कारमूल्ये त्यांना जीवनात उपयोगी ठरतील असे शेवटी त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत जवळपास तीनशे नव्वद विद्यार्थी सहभागी झाले होते. श्रीगणेशाचा जयघोष करीत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक मूर्तीं पाहून उपस्थितही भारावून गेले. उपक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
