
.निगडोळ:-( प्रतिनिधी )येथील रयत शिक्षण संस्थेचे मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या ज्ञानसंकुलाचे उपशिक्षक नितीन जयराम कापडणीस यांना या शैक्षणिक वर्षाचा स्व.कमळाबाई दगू रोटे यांच्या स्मृती स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या गुणवंत रयत सेवक पुरस्काराने छत्रपती शिवाजी विद्यालय वनसगाव ता.निफाड जि.नाशिक या विद्यालयाचे प्राचार्य सी.डी.रोटे व ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांच्या उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मा.अशोकजी दुधारे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.उत्कृष्ट सूत्रसंचालक,उत्तम इंग्रजी शिक्षक व तंत्रस्नेही शिक्षक म्हणून निगडोळ पंचक्रोशीत परिचित असलेले नितीन कापडणीस हे विद्यार्थी प्रिय अष्टपैलू शिक्षक असून ज्ञानदानाचे पवित्र कार्य ते निगडोळ विद्यालयात प्रामाणिकपणे करीत आहेत.विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून मिळविलेल्या यशाबद्दल निगडोळ विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.देवदत्त बोरसे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवृंदानी त्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन मा.बबनराव यशवंत मालसाने व सर्व सदस्यांनी तसेच विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी व निगडोळ पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी नितीन कापडणीस सर यांचे भ्रमणध्वनीवरून व प्रत्यक्ष येऊन शब्दसुमनांनी अभिनंदन केले.
