
जळगाव निंबायती (वार्ताहर) मालेगाव तालुक्यात गेल्या आठवडाभरात चांगला पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग समाधानी झाला आहे. त्यामुळे पोळा सणाचा आनंदही सर्वत्र द्विगुणित झाला. तालुक्यातील पाथर्डे येथे पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रगतीशील शेतकरी अर्जुन शिंदे स्वतः बैलजोडीसह मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी घेऊन जातांना.
