
मुळ डोंगरी (प्रतिनिधी)श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी* ,येथे न्यू फ्युचर बॉईज ग्रुप सेवानगर”* यांची नुकतीच कबड्डी स्पर्धा विद्यालयाच्या क्रिडांगणात पार पडली. त्या स्पर्धेसाठी क्रिडांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल स्पर्धेच्या आयोजकांतर्फे ,सरस्वती माध्यमिक विद्यालयास चार बैठक खूर्च्या व एक भिंतीवरील आकर्षक घड्याळ आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी चॉकलेट इत्यादी. भेटवस्तू देण्यात आल्या .याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. एस.जी. राठोड साहेब व सचिव श्री. सिद्धांत दादा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, आयोजकांतर्फे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. बोरसे एस. एस.मॅडम यांच्या हस्ते भेटवस्तू स्विकारण्यात आल्या.
