
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३००६ वा दिवस* कुणीही सत्य, प्रेम आणि निष्कपटता यांच्या शक्तीला रोधू शकणार नाही. तुम्ही सच्चा दिलाचे आहात काय? मरण आले तरी तुम्ही निःस्वार्थ राहू शकता काय? तुमचे हृदय प्रेमाने भरले आहे काय? जर असे असेल तर तुम्ही कुणालाही, एवढेच नव्हे तर मृत्यूलाही भिण्याचे कारण नाही. वत्सांनो, पुढे चला! साऱ्या जगताला ज्ञानाच्या प्रकाशाची आवश्यकता आहे. हा प्रकाश मिळविण्यासाठी ते मोठ्या उत्सुकतेने आपल्याकडे पाहत आहे. केवळ भारतापाशीच हा ज्ञानाचा प्रकाश आहे. तो इंद्रजाल, जादू वा भोंदूगिरी यामधे नसून धर्माच्या खऱ्या स्वरूपासंबंधीच्या सर्वोच्च आध्यात्मिक सत्यांच्या महान् उपदेशात तो सामावलेला आहे
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७*
★ श्रावण पिठोरी अमावस्या
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. २३ ऑगस्ट २०२५ ★ १९१८ प्रसिध्द मराठी लेखक, कवी, लघुनिबंधकार, टिकाकार, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवीवर्य गोविंद विनायक तथा विं. दा. करंदीकर यांचा जन्मदिन
.★ १९७४ मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा स्मृतीदिन
★ आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन.
