
मनमाड 🙁 प्रतिनिधी)- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश मेडिअम स्कूल मध्ये बैलपोळा सण संपन्न झाला विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम घेतला. अनेक विद्यार्थी शेतकरी वेशभूषा करून आले व आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पारंपारीक बैलपोळा सण साजरा करण्यात आला.श्रीम.आहेर .यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. सहभागी विदयार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापाका श्रीम. प्रियांका धात्रक यांनी विशिष्ट कोतुक केले व पुढील उपक्रमास शुभेच्छा दिल्यात. यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक समिती प्रमुख श्रीमती एकता बोधडे यांनी विशेष मेहनत घेतली.
