
मखमलाबाद विद्यालयात अक्षय ऊर्जा दिनानिमित्त घोषवाक्य प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे याप्रसंगी सर्व विज्ञान शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे “अक्षय ऊर्जा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कु.कृतिका साबळे हिने अक्षय ऊर्जा दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.तिने सांगितले की अक्षय ऊर्जा म्हणजे आपल्या भविष्याची गुरुकिल्ली.सौरऊर्जा, पवन ऊर्जा,जलऊर्जा यासारख्या नैसर्गिक स्रोतांचा वापर करून आपण आपले भविष्य सुरक्षित करू शकतो.आपल्या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आणि ऊर्जेची बचत करण्यासाठी अक्षय ऊर्जेचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. अक्षय ऊर्जा दिनानिमित्त इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे घोषवाक्य बनविलेले होते. या घोषवाक्य प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे यांनी केले.याप्रसंगी सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु.अमृता गीते हिने केले.इयत्ता ९ वी कच्या या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका वर्षा पाटील यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
