
.ओझर: दि.२१ वार्ताहर ओझर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माधवराव बोरस्ते विद्यालयास संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांनी भेट देऊन तेथील नूतन इमारत बांधकामाची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष विश्वासराव मोरे माजी प्राचार्य अरुण पिंगळे ऑडिटर बस्ते मुख्याध्यापक सोपान वाटपाडे पर्यवेक्षक दशरथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी शालेय कामकाज पाहणी करून समाधान व्यक्त केले. शेवटी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन नवीन शैक्षणिक वर्षाच्या कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
