
मखमलाबाद विद्यालयात बैलपोळा सणानिमित्त बैलांचे पूजन करताना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे शेतकऱ्यांचा महत्त्वाचा असा बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे यांच्या शुभहस्ते बैलांचे पूजन केले.याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षकवृंद व इयत्ता ९ वीचे सर्व वर्गशिक्षक उपस्थित होते.कु.तनुजा अहिरे हिने बैल पोळ्या निमित्त आपले मनोगत व्यक्त केले

.तिने सांगितले की बैलपोळा हा सण शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा असा सण आहे.या दिवशी शेतीची सर्व कामे बंद ठेवली जातात.बैलांना अंघोळ घालून त्यांना हार,फुले यांनी सजविण्यात येते.अंगावर रंगीत रंग लावले जातात.त्यांच्या शिंगांना सजावट करून त्यावर रंगीत पट्ट्या,घुंगरू व बाशिंग बांधले जातात.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रत्येक गावात हा सण अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.ग्रामीण भागात सजविलेल्या बैलांची व त्यासोबत घोड्यांचीही मिरवणूक गावातून काढून मारुती मंदिरासमोर बैलांना नतमस्तक केले जाते.महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्येही हा सण साजरा केला जातो.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रतीक्षा घुले व आभार प्रदर्शन कु.मोक्षदा चौधरी यांनी केले.इयत्ता ९ वी डच्या या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका अश्विनी वडघुले यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
