
नांदगाव.( प्रतिनिधी) : मुलांमध्ये अनेक सुप्त गुण असतात त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व निसर्गाशी नाते घट्ट व्हावे या उद्देशाने नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कशी बनवावी हे विद्यालयातील कला शिक्षक अनिकेत राऊत यांनी प्रात्यक्षिकासह करून दाखविले. शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मातीमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. पर्यावरणाची कुठलीही हानी होत नाही. याचे महत्त्वविद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अतिशय सुबक, सुंदर पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवल्या.या प्रसंगी मुलांमध्ये उत्साह दिसून आला. संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमारजी कासलीवाल ,तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा,प्रशासक प्रकाश गुप्ता ,सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

विद्यालयातील शिक्षक , संजय त्रिभुवन, संजय शिवदे,शरद पवार, राहूल आहेर , संदीप आहेर, रवींद्र चव्हाण, विजय गायकवाड,मनोज साळुंखे,केतन दळवे, मनोज व्हरगीर,रिझवान मन्सुरी,मयुर चव्हाण , हर्षदा भालेराव , रुपाली मालकर ,योगीता गायकवाड ,सोनाली बोडके, यांनी कार्यशाळा यशस्वी व्हावी म्हणून विशेष मेहनत घेतली या कार्यशाळेचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक संदीप आहेर यांनी तर संजय शिवदे यांनी आभार व्यक्त केले.
