
कसबे सुकेणे (प्रतिनिधी ) मविप्र समाज संस्थेच्या कर्मवीरांनी सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी सर्वस्व पणाला लावून मोठे त्याग करत आपले सर्वस्व अर्पण केले अशा कर्मवीरांचे शिक्षकांनी शिक्षणाच्या माध्यमातून ऋण फेडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तत्त्वज्ञ विद्यापीठाचे प्राध्यापक थोर साहित्यिक प्रा डॉ साहेबराव निगळ यांनी केले ते मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात समाज दिन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे उपसभापती डी बी अण्णा मोगल होते सुरुवातीला उपसभापती मोगल यांच्या हस्ते समाज दिन ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले

समाज गीत कलामंच व संगीत शिक्षक रामेश्वर धोंगडे यांनी सादर केले प्रास्ताविक प्राचार्य रायभान दवंगे यांनी केले यावेळी प्रमुख अतिथी प्रा डॉ निगळ यांनी अवांतर वाचनाशिवाय भाषा व इतिहास विषय शिक्षक परिपूर्ण होऊ शकत नाही शिक्षक हे ज्ञानाची आग प्रज्वलित करतात जन्माने आपण जंतू असतो पण संस्काराने आपण माणूस होऊ शकतो आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क ज्या कर्मवीरांनी दिला त्या कर्मवीरांचे ऋण शिक्षणाच्या माध्यमातून फेडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी डॉ निगळ त्यांनी केले

यावेळी व्यासपीठावर आचार्य प्रवर महंत सुकेणेकर महाराज, माजी मुख्याध्यापक विठ्ठल सोनवणे, माजी प्राचार्य व्ही एस काळे, अतुल भंडारे, मोतीराम जाधव, उपसरपंच सचिन मोगल, विष्णुपंत उगले, राजाराम भंडारे, मुरलीधर मोगल, डॉ मत्सागर, दिलीप मोगल, विश्वनाथ मोगल, रामराव मोगल, रामकृष्ण बोंबले, योगेश मोगल, भाऊसाहेब भंडारे, अरुण मोगल, संग्राम मोगल, लालचंद सोनवणे, माजी उपसरपंच अनुपमा जाधव, ॲड निर्मला आरिंगळे, समाधान सुर्वे रामेश्वर काठे, प्रकाश धुळे, संतोष भंडारे, लक्ष्मण पडोळ आदींसह स्कूल कमिटीचे सदस्य व सभासद उपस्थित होते समाज दिनाचे औचित्य साधून इयत्ता दहावी, बारावी व गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देत सत्कार करण्यात आला

यावेळी विद्यालयात रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा व पुष्परचना स्पर्धा घेण्यात येऊन व चित्रकला दालनाचे उद्घाटन करण्यात आले अध्यक्षीय मनोगतातून उपसभापती मोगल यांनी कर्मवीरांना अभिवादन करत उपस्थितांना समाज दिनाच्या शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन कवी शिक्षक मुकुंद ताकाटे यांनी बक्षीस वितरण भारत मोगल यांनी तर आभार उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांनी मानले कार्यक्रमासाठी अशोक भंडारे, रामराव भंडारे, सिताराम मोगल, वसंत पागेरे, गोकुळ सोनवणे,सुवर्ण भंडारे, मेघना खोडे, शबाना पठाण, सोनाली काठे, पर्यवेक्षक अरुण झिंझुर्डे,सीमा गोसावी, प्रा राजेंद्र धनवटे, राहुल मोगल आदींचा सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते
