
नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावर दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी देवदर्शन करून परतत असतानाज्ञ झालेल्या ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये गंभीर जखमी असलेल्या भक्ती आप्पासाहेब राऊत हिचे छत्रपती संभाजी नगर येथील इस्पितळात उपचार सुरू असताना दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास निधन झाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील डोंगरावर पिनाकेश्वर महादेवाचे दर्शनासाठी आलेल्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या खामगाव येथील भाविकांचे ट्रॅक्टर देवदर्शन करून घाट उतरत असताना दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अगदी शेवटच्या टप्प्यावर ट्रॉलीसह ट्रॅक्टर सुमारे 200 फूट खोल दरीत गेल्याने ट्रॉलीमध्ये बसलेल्या पैकी कांताबाई नारायण गायके वय वर्ष 56 व कमलबाई शामराव जगदाळे वय वर्ष 65 या दोन महिलांना डोक्याला व इतर ठिकाणी मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याने इस्पितळात उपचार करण्यापूर्वी त्यांचे निधन झाले होते. यावेळी देवदर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांनी वेळेत तत्परता दाखवत सर्व जखमींना बाहेर काढून तात्काळ बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. तर तिसरी गंभीर जखमी असलेली भक्ती आप्पासाहेब राऊत वय वर्ष 14 या मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी बुधवारी सकाळी साडेदहा वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. कु. भक्तीच्या निधनाची बातमी समजताच जातेगाव तसेच खामगाव आणि पंचक्रोशीत श्लोक कडा पसरली आहे. तिच्यावर खामगाव येथील समाधान मध्ये दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातातील ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अन्य बारा जनावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या झालेल्या अपघातापूर्वी च्या दिवस अगोदर दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी एका ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये येवला तालुक्यातील उंदीर वाडी येथील देविदास दौलतराव सोनवणे वय वर्ष 55 यांचे निधन झाले होते. तर अन्य चार जण जखमी झाले होते.
