
..सिन्नर(प्रतिनिधी) शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात अंनिसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक चे आयोजन केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सिन्नरच्या नगरपरिषद समोरील हुतात्मा चौक ते पुन्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान मॉर्निंग वॉक करण्यात आले. यामध्ये अंनिसचे सिन्नर तालुका अध्यक्ष हरिभाऊ तांबे,कार्याध्यक्ष सुकदेव वाघ,प्रधान सचिव राजेंद्र मिठे,बापू चतुर,प्रमोद काकडे,बस्ती राम कुंदे , इंदुताई कोकाटे तसेच कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी हरिभाऊ तांबे यांनी मनोगत व्यक्त करताना, डॉ.शहीद नरेंद्र दाभोळकर यांनी समाजातील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी ,समाज विवेकी होण्यासाठी उंच आपले बलिदान दिले, काही सनातनी मारेकऱ्यांनी त्यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी हत्या केली.अद्याप त्यांचे मारेकरी शोधण्यास सरकारला यश येत नाही ही दुर्दैवी बाब असल्याचे सांगितले.
