
नाशिक (प्रतिनिधी )ब्राह्मण महासंघ शहर अध्यक्ष श्री भगवंत (बाळासाहेब) पाठक व महिला शहर शहर अध्यक्षा सौ सोनाली (ताई) कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नासिक (सिडको) ब्राह्मण महासंघ महिला समितीच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त बुधवार दि 20-08-25 सिडको विभाग अग्निशामक दलाला भेट दिली व रक्षाबंधनाचे औचित्य साधून तेथील कर्मचारी वृंदाला राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या कामाचे स्वरूप समजावून घेतले. या कार्यक्रमाची आखणी सौ टिपरे यांनी केली होती

. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिडको महिला समिती अध्यक्षा सौ अर्चना उपासनी यांनी केले. डॉ. शाल्मली गदगे यांनी सूत्रसंचालन केले व सौ माधवी मोराणकर भाजपा शहर उपाध्यक्ष यांनी ब्राह्मण महिला समितीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी ब्राह्मण महिला समितीतर्फे मानसी वाळींबे ,नयन कुटुंबळे, शैला कुलकर्णी, स्नेहल टिपरे उपस्थित होत्या या प्रसंगाची आठवण म्हणून अग्निशामक दल कर्मचारी हर्ष पटेल, राकेश खडसे, शेख, अजिंक्य वझरे ,किरण धनवटे, पार्थ शिंदे आणि तुषार पाटील यांनी स्वामी समर्थांचे सुंदरशी फ्रेम सिडको ब्राह्मण महिला समितीला भेट दिली.
