
. नाशिक (.प्रतिनिधी ) *मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जन्मदिनी १९ ऑगस्ट रोजी समाज दिनानिमित्त ग्रंथालय चळवळीतील विशेष योगदान देणाऱ्या संस्थेला दिला जाणारा गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि,नाशिक पुरस्कृत *” स्वर्गीय द.गो. खैरनार गुरुजी ग्रंथालय पुरस्कार “* यावर्षी *श्री माणकेश्वर वाचनालय , निफाड* या संस्थेला मविप्र संस्थेचे सरचिटणीस श्री. नितीनभाऊ ठाकरे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मविप्र चे अध्यक्ष डॉ.सुनिल ढिकले उपाध्यक्ष विश्वासराव मोरे व मान्यवर संचालक उपस्थित होते.यामुळे वाचनालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. पुरस्कार स्विकारण्यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, संचालक दत्ताकाका उगावकर, तनवीर राजे, राजेंद्र सोमवंशी, राजेंद्र खालकर, सुनिल चिखले उपस्थित होते.श्री माणकेश्वर वाचनालय , निफाड या संस्थेने १०५ वर्षापासून ग्रंथालय चळवळ व सांस्कृतिक चळवळीत योगदान दिले आहे ,वाचन चळवळीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील घटकांना सामावून घेत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आपले स्थान निर्माण केले आहे.नाशिक जिल्ह्यातील सन्मानाच्या स्व.द.गो. खैरनार गुरुजी ग्रंथालय पुरस्काराबद्दल अनेक मान्यवरांनी संस्थेचे अभिनंदन केले आहे.
