
नामपुर (प्रतिनिधी) समाजश्री प्रशांतदादा हिरे कनिष्ठ महाविद्यालयात ‘आरोग्य व सुरक्षा समिती’ अंतर्गत *”सायबर गुन्हे व सुरक्षा”* या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आरोग्य व सुरक्षा समितीचे प्रमुख प्रा.अमित सोनवणे यांनी उपप्राचार्य प्राध्यापक महेंद्र दासनूर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाच्या आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून ऍडव्होकेट सुप्रिया दिनकर भामरे उपस्थित होत्या. त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून सायबर गुन्हे कसे होतात व त्या पासून कसे सुरक्षित राहावे या विषयी महत्त्वपूर्ण व्याख्यान दिले व विद्यार्थ्यांचे सायबर गुन्ह्यातील शंकांचे निरसन केले

. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ डि.एफ. शिरुडे उपस्थित होते. ,प्रा. मुकेश भामरे, प्रा.डॉ.आनंद जोशी,प्रा.संदीप निकम प्रा.आर.बी देसले, आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.अमित सोनवणे यांनी तर आभार प्रा.अनिकेत वाघ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.सुनील खैरनार प्रा. प्रकाश महाले,प्रा.महेश खैरनार,प्रा.गणेश महाले यांचे सहकार्य लाभले.
