
. नांदगाव ( प्रतिनिधी )- मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात २० ऑगस्ट रोजी सद्भावना दिनी भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सद्भावना म्हणजे सलोखा आणि प्रामाणिकपणा. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश देशातील लोकांमध्ये जातीय सलोखा, शांतता, राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुत्व वाढवणे हा आहे.हा दिवस लोकांना एकत्र येऊन विविध जाती, धर्म आणि भाषांमधील मतभेद विसरून एकोप्याने राहण्याचा संदेश देतो हे सांगितले. याप्रसंगी विद्यालयातील उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण , श्री प्रशांत पाटील,श्रीमती वैशाली पाटील श्री अनिल जाधव, सतीश घोडके, श्री राठोड व विद्यार्थ्यां उपस्थित होते.
