
नाशिक (प्रतिनिधी). साहित्य व सांस्कतीक वारसा जपणारे गिरणा गौरव प्रतिष्ठान संचलीत महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचतर्फे शनिवार 23 ऑगस्ट रोजी मराठा विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या आय. एम.आर. टी ऑडिटेरियम शिवाजीनगर कॅम्पसगंगापुररोड नाशिक येथे सकाळी नऊ वाजता पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, बाल हक्क आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर ,नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसचिव चित्रा बाविस्कर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती भामरे, महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा म्हस्के, राष्ट्रीय सरचिटणीस भारती निकम,गिरजा मंचच्या कार्याध्यक्ष पूजा दंडगव्हाळ यांच्या शुभहस्ते या वकृत्व स्पर्धांचा शुभारंभ होणार असून,सांयकाळी 5.30 वा. या वकुत्व स्पर्धांचा बक्षीस वितरण स्पर्धा ठिकाणी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस अड. नितीन भाऊ ठाकरे यांच्या शुभहस्ते व पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गिरणा गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व साहित्यिक सुहास टिपरे, महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या जिल्हाध्यक्ष शितल कुयटे, महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या जिल्हा उपाध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या महिला वकृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या स्पर्धांमध्ये जवळपास महाराष्ट्रातुन 80 महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून, स्व. विमल हरिश्चंद्र टिपरे यांच्या स्मरणार्थ प्रथम,द्वितीय तुतीय 5000/3000/2000 अशा प्रकारचे रोख बक्षीस स्वरूपात व मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. महिलांनी महिलांसाठी स्थापन केलेल्या गिरजा महिला मंचच्या अशा अभिनव उपक्रमाचे राज्यातुन कौतुक केले जात आहे.
