
वाडगाव (प्रतिनिधी ):के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे विद्यार्थि कृषीदूत नलावडे साहिल, मानस नांदुरकर, पुष्पेंद्र नायक, साहिल पाबळे, आदेश परदेशी, सर्वेश शिंदे, आदित्य बनकर, यांनी वाडगाव येथे रमेश कसबे यांच्या घरी अझोलाची निर्मिती केली.त्यात त्यांनी एक प्लास्टिकची टाकी आडवी कापली,त्यात त्यांनी माती,शेण व पाणी यांचे मिश्रण केले व या मिश्रणात अझोलाचे कल्चर सोडले .हे कल्चर त्यांना के.के.वाघ कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक टी.बी.उगले सर यांनी दिले होते. अझोला ची १० दिवसांत पुर्ण वाढ होते व ते भातामधे सोडले जाते,हवेतील मुक्त नत्र स्थिर करून ३० ते ४० किलो नत्र प्रति हेक्टरी मिळत असते. यामुळे युरिया खताची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होतो. वनस्पतीमध्ये वाढ वर्धक पदार्थ जमीन तयार करून सोडल्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. प्रतिहेक्टरी उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी वाढ होते. हरितद्रव्य मुक्त हिरवी पानवनस्पती असल्याने हवेत प्राणवायू सोडते व हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. दुभत्या जनावरांना दररोज खाद्यान्नामध्ये दिल्यास दुधात फॅटचे प्रमाण वाढते. यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते ही माहिती कृषी दुतांनी ग्रामस्थांना दिली
