
सिन्नर (प्रतिनिधी) महाराष्ट्र चेंबर्स आफ कॉमर्स, इंडस्ट्री ॳॅन्ड अग्रीकल्चर आणि भरारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण “कृषी पर्यटन प्रशिक्षण आणि आई महिला पर्यटन विकास” शिबीर सिन्नर येथे आयोजित करण्यात आले होते.प्रास्ताविक शिबीर आयोजक कल्पना रेवगडे यांनी केले. महिलांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी अशी महिला शिबीरे उपयुक्त ठरतील. पर्यटन विकासाची सर्वत्रच मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विकास महामंडळाच्या विविध विकास योजनांची माहिती पर्यटन विकास महामंडळाच्या प्रकल्प अधिकारी गायत्री चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर्स आफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज पर्यटन विभागाचे चेअरमन दत्ता भालेराव यांनी देशविदेशातील आणि राज्यातील पर्यटन विकासाच्या संधी आणि करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. बाळासाहेब गुंजाळ, सुभाष गिते, रतन पडवळ, कल्पना रेवगडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते सर्वांनी शिबीर्थीनां मार्गदर्शन केले. अनेकांच्या प्रश्नानां यावेळी उत्तरे देण्यात आली.सिन्नर वाचनालयाच्या सभागृहात तालुक्यातुन महिलांची मोठ्या संख्येने शिबिरास उपस्थिती होती.आभार अनिता गांडोळे यांनी केले.
