
मोहाडी:(बातमीदार) मविप्र समाज संचलित अभिनव बालविकास मंदिर शाळेत दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण गोपिका यांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सगळ्यांची मने जिंकली. चिमुकल्यांनी दहीहंडी फोडण्याचा मनसोक्त आनंद लुटला. अभिनव मुख्याध्यापक सोनाली देशमुख श्रीकृष्ण जन्माष्टमी विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. सर्व विद्यार्थी शिक्षक समवेत दहीहंडी फोडण्यात आली व सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. अभिनव शिक्षिका अश्विनी बस्ते यांनी श्रीकृष्णाच्या जीवनातील गमतीशीर गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या. विद्यार्थ्यांनी राधा-कृष्ण च्या गाण्यावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाची शालेय व्यवस्थापन व ग्रामस्थांनी कौतुक केले कार्यक्रमास विद्यालय मुख्याध्यापक शिवाजी शिंदे ज्येष्ठ शिक्षक प्रदीप जाधव दिंडोरी पेठ मविप्र संचालक प्रवीण जाधव अभिनव शालेय समिती अध्यक्ष रामराव पाटील एस एस जाधव स्वातंत्र सैनिक दौलतराव देशमुख (ए एस आय) राजू अण्णा कळमकर शालेय व्यवस्थापन सदस्य.डॉ.चंद्रकांत पाटील व गावकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन धनश्री शंखपाळ यांनी केले.
