
आळेफाटा (प्रतिनिधी):संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०व्या) जन्मोत्सवानिमित्त श्री संत सावता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व कवी-कवयित्रींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.प्रथम क्रमांक- ₹३००१, द्वितीय क्रमांक- ₹२००१ , तृतीय क्रमांक- ₹१००१ तसेच तीन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी- ₹५०१ व सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा नि:शुल्क असून ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ‘या विषयावरील स्वरचित काव्यरचना दिनांक २० ऑगस्ट २०२५ पर्यंत श्री विशाल रघुनाथ गडगे (९७६३७१२३०१) , श्री संदिप वाघोले सर(९८६०७७७४२२) यांच्या व्हाटसपच्या क्रमांकावर पाठवाव्यात, असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष संजय लक्ष्मण शिंदे यांनी केले आहे.
