
ओझर: (वार्ताहर) येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात शिवजयंती निमित्त शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे समिती सदस्य लक्ष्मणराव चौधरी पुंडलिक गवळी लिपिक नाठे,मुरकुटे आदींनी पूजन केले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अभिषेक पूजन शिक्षिका एस डी शिंदे, श्रीमती भामरे या दाम्पत्यांनी केला.

अभिषेक विधीपूजा शिक्षक हेमंत भट यांनी केली. याप्रसंगी लेझीमपथक व ढोलवाद्याच्या गजरात छत्रपतींची मिरवणूक काढण्यात आली. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केलेल्या होत्या. छत्रपती वेशभूषा साई गायधनी, जिजाऊची वेशभूषा श्रावणी जाधव, सईबाईची वेशभूषा राधिका देवरे यांनी केली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांचे ‘जाणता राजा’ हे शिवचरित्रपर व्याख्यान संपन्न झाले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना श्री पिंगळ व राजश्री टरले यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षिका रेखा देशमाने यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

शिक्षिका शताक्षी पुरकर यांनी राजे छत्रपती यांच्या जीवनावर व्याख्यान दिले. फलकलेखन कलाशिक्षिका सविता पवार यांनी केले. संगीत शिक्षिका शितल आहेर व गीतमंचाने पोवाडा सादर केला. या सोहळ्यास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले, शितल हंडोरे यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक सतीश केदार यांनी मानले.
