
नाशिकरोड:- (. प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी नासाका विद्यालयात विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवविचारांचा जागर करण्यात आला.
पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालय आणि आदर्श प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी विद्यालय ते नासाका मुख्य कार्यालयापर्यंत शिवविचार फेरी काढण्यात आली. यावेळी केशरी रंगाच्या झेंड्यांसह मराठमोळी वस्त्रे परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘जय जिजाऊ; जय शिवराय,’ ‘ जय भवानी; जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसरात चैतन्य निर्माण झाले. त्यानंतर शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अरुण पगार आणि चंद्रकांत खाणकरी, सर्व शिक्षक-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हिमांशू गोसावी, जान्हवी गोसावी यांनी शिवगर्जना दिली. शिवन्या राठोड, देवांश गायधनी, धनश्री मोरे, शरण्या गायधनी, श्रीकांत आडके, गौरी कासार, श्रुती आडके, इशान सानप, ईश्वरी आडके, वेदिका आडके, कोमल धांडे, धनश्री सानप, आर्या आडके, सृष्टी आडके,

दीपाली राठोड, कोमल आडके, धन्वंतरी गायधनी, प्रयाग शिरोळे, खुशी सानप, समीक्षा शिरोळे, कावेरी आडके, तनिष्का भरसट या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या कार्याबद्दलची माहिती दिली. शुचिता पिंपळे हिने ‘शिवरायांच्या वाघिणी आम्ही शिवकन्या…’ आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा…’ गीतावर बहारदार नृत्य सादर केले. कार्यक्रमाध्यक्ष अरुण पगार यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर विचार मांडले. विद्यार्थ्यांसह जेष्ठ पालक शिवराम राठोड, निलेश मोरे, नितीन आडके, विमल राठोड, जितेंद्र सोनवणे, पूनम सोनवणे, यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. सांस्कृतिक विभागप्रमुख कैलास लहांगे यांनी सूत्रसंचालन केले.
