
ओझर: ( वार्ताहर) येथील ‘मविप्र’ संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात एसएससीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. प्रास्ताविक बाबासाहेब लभडे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी खुशी चोथे, ताहीर पठाण, निशांत शेलार, पूर्वा पगार, ओम काटकर, शिक्षक महेंद्र डांगले, बाबासाहेब गायकवाड, शितल हंडोरे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन केले. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे ज्येष्ठ शिक्षक दादासाहेब सोनवणे भाऊसाहेब रौंदळ रेखा देशमाने आत्माराम शिंदे नरेंद्र डेरले आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. फलक रेखाटन कला शिक्षिका सविता पवार यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
