
नांदगाव(प्रतिनिधी):- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि संस्थापक अध्यक्ष सौ. संगिता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यात आला. अध्यक्षीय भाषणात सौ. संगिता सोनवणे यांनी शिवरायांच्या विचारांची आणि कार्याची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. विशेषतः महिला सक्षमीकरण आणि स्वराज्यातील स्त्री सन्मानाचा आदर्श समोर ठेवून काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी संस्थेच्या महिला पदाधिकारी आणि इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरवातीला प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

सचिव आशाबाई काकळीज यांनी आलेल्या सर्व सदस्य आणि मान्यवरांचे स्वागत केले तर मुस्लिम महिलांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून छत्रपती शिवराया बद्दल आदर व्यक्त केला.या प्रसंगी सरला मोढे,वंदना बहिकर,सुमित्रा शिंदे,मनिषा भाबड,रत्ना मगर आशा भोसले, सरला वाबळे,शगुफ्ता शेख, रुबिना शेख अलका गायकवाड यांच्यासह विद्यालयातील शिक्षिका, कर्मचारी आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधारवड महिला संस्थेच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
