

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१८६ वा दिवस
भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारा भारतभूमीचा खराखरा पुत्र म्हणून शिवाजी महाराजांचा नामोल्लेख करावा लागेल. आज ना उद्या भविष्यातील हिंदुस्थान कसा असेल, अनेक स्वतंत्र राज्ये एका सार्वभौम छत्राखाली कशी एकत्र येतील याचे स्पष्ट चित्र दाखवणारे ते एक द्रष्टे राजे होते. अगदी किशोर अवस्थेत शिवाजी महाराजांनी स्वराज स्थापनेची शपथ घेतली. साधनसंपत्तीची उणीव, स्वकीयांचा विरोध, मोगलशाही व दक्षिणेतील मुस्लिम शासकांचा विरोध असतांना देखील महाराज डगमगले नाहीत. त्यांनी आपल्यासोबत स्वराज स्थापनेसाठी स्वतःच्या प्राणांची आहूती देणारे अठरापगड जातीचे गोर गरीब मावळे कसे गोळा करुन स्वराज्य निर्माण केले. हा सुद्धा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास ३० शके १९४७
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६
★ १६३० हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती
★ १९१५ महात्मा गांधीचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांचा स्मृतीदिन
★ १९०६ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधवराव सदाशिव गोळवळकर (गुरुजींची) जयंती
शिवजयंतीच्या सर्वांना शिवमय हार्दिक शुभेच्छा
★ जय शिवाजी… जय भवानी…
