
नांदगाव- ( प्रतिनिधी ) ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सारताळे येथे जाणता राजा शिव छत्रपती यांची प्रतिमा पुजन व महाआरती करून शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली सदर प्रसंगी संस्था कोषाध्यक्षा तथा प्राथमिक आश्रमशाळा मुख्याध्यापिका मा. नम्रता पगार मॅडम यांनी शिवजयंती साजरी करून आपलं कर्तव्य संपत नाही तर शिवछत्रपतींच्या विचाराचा आणि संस्काराचा वारसा जपला पाहिजे असे नमुद केले.

आश्रमशाळा प्राचार्य समाधान चौधरी यांनी युगपुरुष, जाणता राजा शिवछत्रपती यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वा बद्दल माहिती देत समृद्ध राष्ट्रासाठीआचार, विचारआणि संस्कार संपन्न कर्तृत्व्वान पिढी उभी करणे काळाची गरज असल्याचे नमुद केले. कार्यक्रम अध्यक्ष पगार मॅडम तर प्रमुख उपस्थिती म्हणुन चौधरी सर, कैलास पगार, भगवान हिरे, अधिक्षक रवींद्र पाटील उपस्थित होते. कार्यक्रम समारोप उपस्थितांचेआभार प्रदर्शन व राष्ट्रीयगीत वंन्देमातरम ने करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन सिद्धी विनायक शिक्षण शास्र महाविद्यालय, नांदगाव छात्राद्यापक विद्यालयाच्या छात्राध्यापक शिक्षकांनी केले.
