
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३००१ वा दिवस
मृत्यूच्या जबड्यात प्रवेशतील, अथांग सागर पोहून पार करतील असे बुद्धिमान आणि धैर्यशील युवक मला हवेत. ध्यासपूर्तीची धग त्यांच्या हृदयात हवी. असे शेकडो युवक युवती मला पाहिजेत. या एका ध्यासाने वेडे व्हा! हेच वेड अनेकांना लागू द्या आणि मग त्यांची जडणघडण, त्यांचे उदात्तीकरण आपण आपल्या पद्धतीने करू. ठिकठिकाणी केंद्रे उघडा, आपल्या कार्यात अधिकाधिक लोकांना समाविष्ट करून घ्या. निःस्वार्थ भावनेतून कार्य पुढे न्या, उदात्त हेतूने कार्यात सहभागी व्हा.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २७ श्रावण (नभमास) शके १९४७
★ श्रावण कृष्ण /वद्य १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५
★ चतुर्थ श्रावण सोमवार शिवमुठ – जवस
★ १७०० मराठाशाहीतील सर्वात कर्तबगार पेशवा, थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्मदिन.
★ १९०० भारताच्या प्रथम महिला कॅबिनेट मंत्री, मुसध्दी राजकारणी, राजदूत, १९५३ संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष पंतप्रधान पंडित नेहरुंची बहिण विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्मदिन.
★ १९४५ आझाद हिंद सेनेचे सरसेनापती सुभाषचंद्र बोस यांचा स्मृतिदिन.
