
आळंदी देवाची (जि. पुणे) :शब्दगंध साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम व परिसंवाद व काव्य संमेलन आळंदी देवाची येथे मोठ्या उत्साहात पार पडले.या साहित्य सोहळ्यात विविध मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत चर्चासत्रे, परिसंवाद आणि काव्यवाचन सत्र रंगले. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिलीप विश्वनाथ कापसे यांना परिषदेतर्फे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.या वेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात कापसे यांचे साहित्यिक योगदान अधोरेखित केले व नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार काढले. संमेलनात राज्यभरातील अनेक कवी, लेखक, साहित्यिक व रसिक यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.आळंदी नगरीत साहित्याचे सुवासिक फुलं खुलली आणि काव्यरसिकांनी आनंदाचा ठेवा अनुभवला.
