
गावदरा (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद शाळा गावदरा येथे उत्साहात साजरा झाला दहीहंडी चा कार्यक्रम*आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावदरा (वेहेळगाव )ता. नांदगाव जि. नाशिक येथे गोपाळकाला व दहीहंडी उत्सव अतिशय उत्साहात साजर करण्यात आला.या कार्यक्रमात लहान मुलांनी राधा,कृष्ण,गोपिका यांची वेशभूषा करून सगळ्यांचे मन जिंकले. गावातील सर्व तरुण मित्रमंडळ यांनीही उत्साहाने दहीहंडी फोडण्यात सहभाग घेतला.कोणी मडके आणले तर कोणी प्रसाद, कोणी दोरीसाठी सहकार्य केले तर कोणी दही आणण्याची शोधासोध कारण आमच्या छोट्याश्या वस्तीवर ना किराणा दुकान ना काही लगेच उपलब्ध होईल अशी सोय तरीही सर्व ग्रामस्थांनी सहभाग घेऊन संपूर्ण परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले होते.ह्या कार्यक्रमसाठी हर्षदा मॅडम व गावातील महिलांचा चांगला सहभाग दिसून आला राधाकृष्णा सोबत नृत्य करण्याचा मोह आवरला गेला नाही. यामध्ये शाळेचे शिक्षक श्री सोनवणे सर आणि युवा प्रशिक्षक श्रीम. हर्षदा मॅडम यांनी देखील मुलांमध्ये नृत्य करण्याचा आनंद घेतला व सर्व विद्यार्थी गावकरी आणि महिला मंडळ यांच्या साक्षीनी दहीहंडी फोडण्यात आली. सर्वाना प्रसाद वाटप करण्यात आला. हा कार्यक्रम पाहून शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी शिक्षकांचे कौतुक केले.
