
नाशिक (प्रतिनिधी ) स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी.जे.चौहान माध्यमिक विद्यालय मोरवाडी येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .माजी विद्यार्थी आणि प्राथमिक विभागाचे शालेय समिती अध्यक्ष प्रसाद वाखारे, यांच्या हस्ते पवित्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उज्वला माळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती गायकर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उज्वला बोरसे पर्यवेक्षक कीर्ती कुमार गहाणकरी, माजी विद्यार्थी किरण महाजन उपस्थित होते. ध्वजारोहणा नंतर ज्येष्ठ नागरिक सहाय्यता व सेवेची शपथ घेण्यात आली त्यानंतर नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी व समूह गीताचे गायन करून देशभक्तीपर वातावरण निर्मिती केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सुनीता गवारी, दिगंबर आवारे सर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व हर घर तिरंगा हे अभियान राबवण्याचे आवाहन करण्यात आले. वंदे मातरम् या गीतांने सोहळ्याची सांगता करण्यात आली.
