
नांदगाव (मुक्ताराम बागुल):- नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावर दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी पाच वाजेच्या सुमारास असलेल्या श्री क्षेत्र पिनाकेश्वर महादेवाचे दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे ट्रॅक्टर देवदर्शन करून घाट उतरत असताना अगदी शेवटच्या टप्प्यावर ट्रॉलीसह ट्रॅक्टर सुमारे दोनशे फूट खोल दरीत गेल्याने ट्रॉलीमध्ये बसलेल्या पैकी कांताबाई नारायण गायके वय वर्षे 56 खामगाव तालुका कन्नड, कमलाबाई शामराव जगदाळे वय वर्ष 62 राहणार जानेफळ या दोन महिलांना डोक्याला व इतर ठिकाणी मार लागल्याने त्या मयत झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चेतन प्रकाश कवडे, प्रणिता प्रकाश कवडे, माया प्रकाश कवडे, आप्पा सोपान राऊत, श्रावणी आप्पा राऊत, कल्याणी राजेंद्र कवडे, साई कवडे, प्रगती सोमनाथ नवले, आदित्य योगेश कवडे हे भाविक देखील जखमी झालेल्या असून वरील सर्व भाविकांवर बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी या शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. वरील घटना घडताच प्रत्यक्षदर्शी भाविक तसेच पर्यटकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ खोल दरीत उतरत सर्व जखमींना बाहेर काढून स्वतःच्या वाहनांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बोलठाण पर्यंत पोहोच केले. सदर घटनेची नांदगाव पोलीस स्टेशनला मिळताच नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून बोलठाण पोलीस औट पोस्टचेज्ञ पोलीस हवालदार भास्कर बस्ते, पोलीस शिपाई परमेश्वर श्रीखंडे आणि होमगार्ड ऋषिकेश पठाडे, गणेश ईप्पर यांना मार्गदर्शन केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
