
नांदगाव (प्रतिनिधी) जनसेवा प्रतिष्ठान अहिल्यानगर संचलित सर डॉ. सी व्ही रामन बालवैज्ञानिक कार्यशाळेद्वारे 13 एप्रिल 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बालवैज्ञानिक परीक्षेत ज्यांनी उज्वल यश संपादन केले त्यांना या कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली होती व त्यांना पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन सावित्रीबाई कृषी विद्यापीठ राहुरी येथे संपन्न झाले. या परीक्षेत व्ही.जे. हायस्कूल या शाळेची विद्यार्थिनी कु. नक्षत्रा विक्रम घुगे हिचा नाशिक जिल्ह्यातून तिसरा क्रमांक आला त्यामुळे तिचा इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ सी एम आर टी कोडदचे मा. सुधीर फाकटकर ,सा. फु.शि.मं.म.फु.कृ.वि.राहुरीचे सचिव डॉ.महानंद माने, अधिष्ठाता (कृषी) तथा संचालक शिक्षण म.फु.कृ.वि.राहुरी, डॉ. साताप्पा खरबडे, सौरव राजेंद्र ढाकणे,अंकिता नगरकर, देगील, यांच्या व पालक प्रा. विक्रम घुगे सौ. दिपाली घुगे यांच्या उपस्थितीत नक्षत्रा विक्रम घुगे हिचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार व गौरव करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे, उपमुख्याध्यापक जोगेश्वर नांदुरकर,टी.एम.भास्कर मधे, गुलाब पाटील, पी.एस.आहिरे, आदींनी नक्षत्रा घुगे हिचे अभिनंदन केले.
