
बोलठाण (प्रतिनिधी) नासिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील लक्ष्मीबाई गायकवाड या अन्यायग्रस्त महिलेने आपल्या न्याय हक्कासाठी संविधानिक मार्गाने भीमटोला सामाजिक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी पासून नासिक येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालय समोरून उपोषण सुरू केला असून आजचा चौथा दिवस आहे. तरी देखील संबंधित विभागातील अधिकारी यांना अद्याप पर्यंत जाग आली नाही. याबाबत सविस्तर तसेच नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक नऊ जुलै 2025 पासून ते 12 जुलै 2025 या कालावधी पर्यंत आपल्या न्याय हक्कासाठी भूमी अभिलेख कार्यालय, जुने तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन समोर बोलठाण तालुका नांदगाव येथील स्वतःची नावे असलेली शेती गट नंबर 310 यांचा सर्वे नंबर 177/1 क्षेत्र 1 हेक्टर 15 आर या शेत जमिनीचे मोजणी केलेल्या हद्द कायम करून मिळणे कामी अमरण उपोषण सुरू केले होते.

नांदगाव पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक श्री भदाणे यांनी आश्वासन दिले होते की मी तुमचे गट नंबर 310 मध्ये स्वतः भूमी अभिलेख कार्यालय नांदगाव येथील अधिकारी यांना घेऊन स्वतः उभे राहून तुमचे मालकीच्या हद्दीत अगोदर असलेल्या ठिकाणी खुणा खुणा होऊन व्यवस्थित करून देणार असून कोणी कामात अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी ग्वाही दिली होती. परंतु त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही त्यामुळे मी नांदगाव पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी मला उडवा उडवी चे उत्तर देऊन हाकलून दिले व स्वतःची शेत जमीन माझीच असल्याने सदरचे कार्यालयातील अधिकारी हे मला जमीन करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी साहेब नाशिक, मा.पोलीस अधीक्षक ग्रामीण नाशिक, मा. तहसीलदार नांदगाव यांना देखील अर्ज करून करून देखील आजपर्यंत कोणतेही उत्तर मिळाले नाही. आश्वासनाची पूर्तता न मिळाल्याने व न्याय न मिळाल्यामुळे मी भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी 14 गोष्ट 2025 पासून विभागीय महसूल आयुक्त नाशिक कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे असे म्हटले आहे. लक्ष्मीबाई गायकवाड यांचा आजचा चौथा दिवस असून त्यांना अद्याप पर्यंत न्याय मिळाला नसल्यामुळे त्यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी पैसे सोडणार नाही असा पवित्र घेतला आहे. आता संबंधित अधिकारी शासन व प्रशासन काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे आहे.रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव (नाशिक)
