
सोनांबे (बातमीदार:) डुबेरेवाडी (ता. सिन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक समाधान मते हे राष्ट्रीय दर्पण शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित होणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल समाधान मोहन मते यांना प्रतिष्ठित राष्ट्रीय दर्पण शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. दर्पणकार बाळकृष्ण जांभेकर पत्रकार संस्थेच्या वतीने राष्ट्राध्यक्ष डॉ. नरेंद्र देशमुख यांनी नुकताच हा सन्मान जाहीर केला आहे. समाधान मते हे गेली अनेक वर्षे शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अविरत कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी निर्णय योगदान उल्लेखनीय आहे. तंत्रस्नेही शिक्षक म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्तरावल्या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार समारंभ सात सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणार आहे. मान्यवरांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिला, पुरुष कार्यकर्त्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. गाव समाजातील अभिमान ठरलेल्या तंत्रस्नेही शिक्षक समाधान मते यांच्या यशामुळे गावात शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. श्री. मते यांच्या या निवडीबद्दल प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉ. विजय बागुल, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास सांगळे, केंद्रप्रमुख विजय निरगुडे, डुबेरे केंद्र मुख्याध्यापक रविंद्र सोनवणे, मनेगावचे मुख्याध्यापक ललित सोनवणे, पाटोळेचे मुख्याध्यापक वसंत गोसावी, वडगाव शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर अहिरे आदींनी अभिनंदन केले आहे.
