
पळाशी (प्रतिनिधी ) न्यू इंग्लिश स्कूल, पळाशी शाळेत भारताचा ७९ वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. विद्यार्थांनी विविध कवयाती सादर केल्या. तसेच शाळेचे झेंडावंदन संस्थेचे सरचिटणीस श्री. रमेश आप्पा पगार यांच्या हस्ते करण्यात आले. सादर कार्यक्रमासाठी गावातील माजी सरपंच सुनंदा ताई सांगळे, दिलीप शेवाळे, साहेबराव घुगे, हिरालाल आव्हाड, संतोष सांगळे, बाजीराव शेवाळे, दीपक घुगे, बाबाजी सानप तसेच अनेक मान्यवर हजर होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. शैलेश पवार यांनी केले. तर प्रास्ताविक श्री.अरुण पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. विशाल देवरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यपाक छगन सांगळे, कैलास राठोड, गोकुळ शिंदे,विजय आव्हाड, अमोल देवरे, संदीप वाघ, संदीप वाघापुरे, प्रभाकर घुगे, अशोक शेवाळे, मनोज शेवाळे यांनी प्रयत्न केले.
