
पळाशी ( प्रतिनिधी ) ग्रामीण विकास संस्था नाशिक संचालित,न्यू इंग्लिश स्कूल, पळाशी शाळेत गोपाळ काला निमित्ताने दही हंडी कार्यक्रम साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी श्रीकृष्ण जयश्री गायकवाड तर राधा पूनम शेवाळे यांनी वेशभूषा केली होती. तसेच विद्यार्थी व विदयार्थीनी यांनी मनमुराद नाचण्याचा आनंद घेतला.

सदर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख अरुण पवार व कैलास राठोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यपाक छगन सांगळे, कैलास राठोड, गोकुळ शिंदे,विजय आव्हाड, अमोल देवरे, संदीप वाघ, संदीप वाघापुरे, प्रभाकर घुगे, अशोक शेवाळे, मनोज शेवाळे यांनी प्रयत्न केले.*
