
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३००० वा दिवस आपल्या राष्ट्राची नौका शतकानुशतके प्रवास करीत आहे. आपल्या अमोल संस्कृतीचे देणे देऊन जगाला समृद्ध करीत आहे. जीवन सागरापासून या राष्ट्रीय नौकेने आजवर अनेक शतके वाटचाल केली आहे आणि लक्षावधी जीवांना सर्व दुःखे ओलांडून पैलतीरावर पोहचविले आहे. आज त्या नौकेला छिद्र पडले आहे. ती छिन्न झाली आहे. हे आपल्या चुकीने घडले की अन्य कोणाच्या हे तितके महत्त्वाचे नाही. आज आपण सारे या नौकेत आहोत. अशावेळी आपण काय करायचे? एकमेकांना दोष द्यायचा? परस्परांशी भांडायचे? आपण आपली सर्वांची शक्ती एकत्र करायची नाही का? याचा आपण गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २६ श्रावण (नभमास) शके १९४७*
★ श्रावण कृष्ण /वद्य ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ ★ १६६६ छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथील औरंगजेब बादशहाच्या नजरकैदेतून सुखरुप पसार झालेत
.★ १९०९ क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना फाशी, स्मृतीदिन.✍️ विवेकानंदांचे जाज्वल्य, प्रेरणादायी व अनुकरणीय असे मनुष्य निर्माणाचे व राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे विचार नियमित व अखंडितपणे गत *आठ वर्षांपासून (३१ मे २०१७)* पासून आपल्या पर्यंत पोहचविण्याचा सातत्यपूर्ण संकल्पाचा ३००० वा दिवस आहे. हे वैचारिक अग्नीहोत्र असेच सतत तेवत रहावे यासाठी ठाकूरांच्या, स्वामीजींच्या चरणी प्रार्थना व आपल्या सर्वांच्या शुभाशिर्वादाची अपेक्षा…
*प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे विवेकानंद विचारदूत 9921976422*
