
सोनांबे (बातमीदार:) सिन्नर तालुका स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 17 महिला कर्मचाऱ्यांना नुकताच प्रदान करण्यात आला. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येतो. सिन्नर पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी अशोक भवारी होते. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी विजय ढवळे, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश सहाणे, कृषी अधिकारी नंदकिशोर अहिरे, ल.पा.चे उपअभियंता अंकितराव जाधव,प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉ.विजय बागुल,शिक्षण विस्तार अधिकारी कैलास सांगळे, श्रीमती अहिरे, कृषी विस्तार अधिकारी मच्छिंद्र कांगणे,संजय गोसावी आदींसह पंचायत समितीच्या सर्व विभागांचे खातेप्रमुख व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

.यावेळी प्रदान करण्यात आलेले पुरस्कार्थी व कंसात विभाग याप्रमाणे गितांजली बेणके (कनिष्ठ अभियंता इ. व द.),स्वाती सरवार (कनिष्ठ सहाय्यक इ. व द.),शारदा आव्हाड (परिचर इ. व द.), कल्पना गरुड (पर्यवेक्षिका एकात्मिक बालविकास),कल्पना गौतम (पर्यवेक्षिका एकात्मिक बालविकास),कल्याबाई कोळपे (कनिष्ठ सहाय्यक),गायत्री कडेपल्ली (कनिष्ठ सहाय्यक),हिराबाई गुंजाळ (पशुधन पर्यवेक्षक),दिपाली मोकळ (कृषी विस्तार अधिकारी),सुचिता तेरे (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी),कल्याणी जाधव (संगणक परिचालक),वंदना भडांगे (प्राथमिक शिक्षिका सिन्नर मुले नं.१),स्वाती खताळे (प्राथमिक शिक्षिका डुबेरे),शारदा पिठे (सहाय्यक लेखाधिकारी),संध्या पवार (वरीष्ठ सहाय्यक),शिला म्हस्के (समुदाय संसाधन व्यक्ती कुंदेवाडी),अनुपमा बोराडे (समुदाय संसाधन व्यक्ती नांदुरशिंगोटे).सदर पुरस्कार तालुक्यातील प्रशासकीय, सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो.

महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या पुरस्कारात प्रशस्तिपत्राचे वितरण करण्यात आले आहे.महिलांच्या आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय आणि आर्थिक विकास या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ महिलांना तसेच महिलांसाठी काम करणाऱ्या दोन स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे कनिष्ठ सहाय्यक धनंजय डावरे यांनी संयोजन केले.या पुरस्कारामुळे सर्व महिलांच्या सक्षमीकरण कार्याला प्रोत्साहन मिळून समाजाला एक सकारात्मक दिशा मिळाला आहे.
