
साकोरा (प्रतिनिधी ) पेङकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय साकोरे येथे आज आनंदाने साजरी करण्यात आली यावेळी बाळकृष्ण , बालगोपाळ वेशभूषा करुन तसेच राधाकृष्ण ची वेशभूषा करुन विद्यार्थी , विद्यार्थीनी आले होते . मोठ्या वर्गातील विद्यार्थी यांनी दही हंङी उभारणी करुन गाण्याच्या तालावर ठेका धरत धार लावले पाण्याचा फवारा अंगावर घेत नाचत दही हंङी उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. यासाठी बोरसे आर बी , बोरसे एस एस , बोरसे व्ही पी , भाबङ सर , श्रीमती पूनम बोरसे , श्रीमती शितल रंधे यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला . यावेळी मुख्याध्यापक योगेश पाटील , बोरसे ए आर , सुरसे एस जी , भारत बोरसे रवी बोरसे रामकृष्ण बोरसे तसेच पालक वर्ग उपस्थित होते.
