
नाशिक (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. शरद गोरे आणि उपाध्यक्ष शुभांगीताई काळभोर यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे नाशिक येथील सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे प्रसिद्ध साहित्यिक माणिकराव गोडसे यांची नाशिक जिल्हा दक्षिण व पश्चिम क्षेत्र अध्यक्षपदी पदांची सन २०२८ या काळावधी साठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी मुळे साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या साहित्य परिषदेचे कार्य नक्कीच समाजात पोहचले जाईल. सदर नियुक्तीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नवनाथ गायकर, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ.सुनिता वाळुंज, कवी बाळासाहेब गीरी आदी साहात्यीकांनी गोडसे सरांचे अभिनंदन केले आहे. व त्यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

मा.डॉ.शरदजी गोरे साहेबांनी सोपविण्यात आलेली कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांची पुण्यभूमी असलेल्या नाशिक जिल्हा दक्षिण व पश्चिम क्षेत्र अध्यक्ष पदाची फार मोठी जबाबदारी मी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री नवनाथ गायकर, सौ.सुनिता वाळुंज ( उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा) श्री बाळासाहेब गिरी आदि सर्वांच्या मार्गदर्शन व सहकार्याने सार्थ आणि यशस्वीपणे पार पाडणार. सदर नियुक्तीबद्दल खूप खूप आभारी आहे.
कवी माणिकराव गोडसे, नाशिक
