
सोनांबे बातमीदार:स्वातंत्र्यदिनाच्या पावन दिवशी पाटोळे (ता. सिन्नर) येथील अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे बालगोपाळांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली.

या सोहळ्यास लायन्स क्लबचे अध्यक्ष सुनिल चकोर, सेक्रेटरी विकास महाजन, ट्रेझरर वसंत पटेल, कांतीभाई पटेल, सरपंच सौ. संगिता आव्हाड, उपसरपंच मोहिनी काळे, आयकर उपायुक्त भुषण सांगळे, मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड. सुरज चकोर, आंतरराष्ट्रीय रोईंग पटू धनश्री सांगळे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदाम पानसरे, महेंद्र तारगे, किशोर लहामगे, सर्जेराव देशमुख, डॉ. प्राणेश सानप, करण कटारिया, नितीन पटेल, स्वप्नील धूत, अभिषेक जाजू, तुषार लोखंडे, विनायक पवार, तेजश्री चकोर, माधुरी महाजन, निता पटेल, दया पटेल, वैशाली तारगे, भारती लहामगे, अश्विनी धूत, रक्षा पटेल आदी लायन्स पदाधिकारी व मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंगणवाडीतील 60 बालके, प्राथमिक शाळेतील 175 विद्यार्थी तर माध्यमिक विद्यालयातील 80 विद्यार्थी अशा एकूण 315 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमात कांतीलाल पटेल यांनी लायन्स क्लबच्या समाजोपयोगी उपक्रमांचा परिचय करून दिला. अध्यक्ष सुनिल चकोर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी प्रास्ताविक केले तर कैलास पवार यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.

या उपक्रमामुळे गावातील शैक्षणिक वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीची ही सामाजिक कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे.
