
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९९९ वा दिवस
आपल्या देशाच्या सर्व भावी आशा आकांक्षा तुमच्यावरच अवलंबून आहेत. उठा लांबच लांब रात्र संपून नवभारताच्या अरुणोदयाचा समय जवळ आला आहे. आता प्रगतीची एक विशाल लाट उठली आहे तिचा वेग कोणीही रोधू शकत नाही. बंधूंनो आता आपल्या सगळ्यांनाच खूप कठोर परिश्रम करावे लागतील. खूप खूप झटावे लागेल. आता झोपायला वेळ नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २५ श्रावण (नभमास) शके १९४७
★ श्रावण कृष्ण /वद्य ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५
★ जन्माष्टमी, श्रीकृष्ण जयंती (वैष्णव)
★ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची ७५० वी जयंती
★ १८८६ स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस (ठाकूर) तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी घेतली.
★ १९५७ महाराष्ट्राचे माजी उप मुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा जन्मदिन.
★ २०१८ माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा स्मृतीदिन.
★ ठाकूरांच्या पवित्र स्मृतीस शतशः नमन.
★ जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा हरे कृष्णा
