
नाशिकरोड: ( प्रतिनिधी )- पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालय आणि आदर्श प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी खा.हेमंत गोडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नासाकाचे संचालक शेहजादबाबा पटेल, नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे, भारतीय सैन्य दलातील जवान चंद्रभान बोराडे, भारतीय थल सेनेतील जवान रोहित गायधनी, श्रीमंत श्री नर्सरीचे संचालक हिरामण आडके, पालक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष भास्कर सानप, युवा उद्योजक ज्ञानेश्वर सानप, ग्रामपंचायत सदस्या शोभा गायधनी, सामाजिक कार्यकर्ते विलास गायधनी, नवनाथ मुंजे, मनोहर सानप, कृष्णा सोनवणे, वैशाली गायधनी, ललिता आडके, संदीप आडके, रवींद्र विंचू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते. नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या समारंभात सामुदायिक कवायतीसह प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीताबरोबर ‘बलसागर भारत होवो…’ हे राष्ट्रीय गीत विद्यार्थ्यांनी तालासुरात सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रा.बाळकृष्ण अंजनगावकर, श्रीमंत श्री नर्सरीचे संचालक हिरामण आडके, नाशिकरोड-देवळाली शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे सरचिटणीस गोकुळ नागरे, वडगाव पिंगळा गावचे माजी पोलीस पाटील कचरू पा.सानप, शिक्षिका एस.एल.वाणी, शिक्षक कैलास लहांगे या मान्यवरांच्या वतीने मार्च-२०२५च्या दहावी शालांत परीक्षेतील गुणवंतांचा रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयाराम गायधनी यांनी फुटबॉल तर सैन्यदलातील जवान चंद्रभान बोराडे, योगेश आडके, मुरलीधर सानप, कचरू पा. सानप यांनी चॉकलेटची भेट देण्यात आली. जवान चंद्रभान बोराडे आणि सामाजिक कार्यकर्ते विलास गायधनी यांनी विद्यार्थ्यांना शुभसंदेश दिला. विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक अरुण पगार, चंद्रकांत खाणकरी यांच्यासह दोन्ही विद्यालयांच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी संयोजन केले.फोटोओळी:- नासाका कार्यस्थळावर आयोजित स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात ध्वजारोहणप्रसंगी माजी खा.हेमंत गोडसे आणि उपस्थित मान्यवर.
