
नाळेगाव (प्रतिनिधी). दिनांक १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा नाळेगाव ता. दिंडोरी जि. नाशिक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रभातफेरीने करण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण समारंभ हा शाळेतील प्रांगणात पार पाडला. ध्वजारोहण नामदेव धारबळे (माजी उपसरपंच) व योगेश लहांगे (शाळा व्यवस्थापन समिती सदस्य) यांच्या संयुक्त हस्ते, तसेच शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ.सविता घोटे, शाळेचे मुख्याध्यापक सुदाम तमखाने यांनी ध्वजपूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुदाम तमखाने यांनी केले.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्री. तमखाने यांनी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचा आढावा तसेच शाळेतील कला, क्रीडा, शिष्यवृत्ती तसेच दहावी बारावी निकाल याबाबतची माहिती उपस्थितांना दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून मानवंदना दिली. त्यानंतर संगीतमय कवायत शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. ९ऑगस्ट आदिवासी दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य सादरीकरण करणाऱ्या सर्व गटांना मुख्याध्यापक श्री.सुदाम तमखाने यांनी बक्षीस जाहीर केले होते , त्या सर्व बक्षीस वितरण मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी अमली पदार्थ सेवन विरोधी शपथ सर्व उपस्थित त्यांना देण्यात आली.

कार्यक्रमासाठी नाळेगावचे प्रथम नागरिक सरपंच श्री. संजय लहांगे, दिंडोरी पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री.वसंत थेटे, उपसरपंच रमेश थेटे, सीटू संघटनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष श्री.रमेश चौधरी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री हरि कडाळी, उपाध्यक्ष सौ.सविता घोटे, माजी सरपंच हिराबाई गुंबाडे, श्री. घनश्याम चौधरी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील व परिसरातीलअनेक प्रतिष्ठित नागरिक पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शेवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सोनार यांनी केले.
